*घोडदौड श्री.कांता भरमा कोडल्याळ यांच्या महालक्ष्मी परिवाराची…*
सावंतवाडी शहरात गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी गडहिंग्लज येथून श्री.कांता कोडल्याळ हे सहपरिवार दाखल झाले. सावंतवाडी शहरात कोलगाव दरवाजा येथे एक छोटे खानी फुटवेअर त्यांनी थाटले. त्यानंतर उभा बाजार येथेही एक छोटेसे फुटवेअर दुकान सुरू केले. फुटवेअर क्षेत्रातील हीच घोडदौड कायम राखताना स्टेट बँकेच्या शेजारी महालक्ष्मी शूज या नावाने चप्पल सॅंडल व शूज चे नवे दालन खुले केले. फुटवेअर क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाल्यानंतर महालक्ष्मी परिवाराने कधीच मागे वळून पाहिले नाही. सावंतवाडीतील ग्राहकांची मागणी आणि प्रोत्साहन मिळत गेल्याने सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या नजीक “महालक्ष्मी सुपर बाजार” या नावाने सर्व प्रकारचे किराणा, क्रोकरी आदी गृहपयोगी वस्तू एकाच ठिकाणी मिळतील असे एक नवे दालन पाच वर्षांपूर्वी सुरू केले.
श्री कांता कोडल्याळ यांना त्यांची गृहलक्ष्मी सौ.रंजना आणि मुलगे राम व विनायक यांची मोलाची साथ लागली. संपूर्ण कोडल्याळ कुटुंब झोकून देऊन आपल्या व्यवसायात काम करत असतात. पंचवीस वर्षे फुटवेअरच्या व्यवसायात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी नावलौकिक मिळवला. पॅरागॉन सारख्या ब्रॅण्डेड कंपनीची संपूर्ण जिल्ह्याची एजन्सी सुद्धा त्यांच्याजवळ असून जिल्हाभर पॅरेगॉनचे चप्पल, शूज वितरण त्यांच्याकडून केले जाते. त्याचबरोबर इतरही काही फुटवेअरच्या एजन्सी त्यांनी सांभाळल्या आहेत.
फुटवेअर क्षेत्रातील यशानंतर महालक्ष्मी सुपर बाजार या नावाने सुरू केलेल्या सुपर मार्केट मध्ये उत्तम जम बसवून ग्राहकांना उत्तम दर्जा आणि योग्य भावात सर्वसामान उपलब्ध करून देत सावंतवाडी एक चांगले सुपर मार्केट म्हणून महालक्ष्मी सुपर बाजारचे नाव झाले आहे. महालक्ष्मी सुपर बाजारला सावंतवाडी शहरात नावलौकिक मिळवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंबहुना कोकणात नसलेले मॉल आणि त्यामुळे सिंधुदुर्गातील ग्राहकांना गोवा, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आदी ठिकाणी खरेदीला जावे लागते, हे लक्षात घेऊन महालक्ष्मी परिवाराने सावंतवाडी, गांधी चौक, येथील आदित्य बिजनेस सेंटर या इमारतीमध्ये पहिला व दुसरा माळा अशा दोन मजल्यांवर भव्य असे *महालक्ष्मी तथास्तु… गारमेंट अँड ॲपरल्स* या नावाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांसाठी *वन स्टॉप शॉप* या धर्तीवर नवे दालन उघडले आहे.
महालक्ष्मी परिवाराने उघडलेल्या महालक्ष्मी तथास्तु या नव्या दालनामध्ये लहान मुलांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या अनेक वस्तू उपलब्ध आहेत. गृहपयोगी वस्तू, लहान मुलांचे कपडे, चप्पल, खेळणी, स्त्रियांचे सौंदर्यलंकार, पर्स, वेगवेगळे ड्रेस मटेरियल, नवनवीन डिझाईनचे ड्रेस, कुर्ते, जीन्स, विविध प्रकारच्या साड्या, पुरुषांसाठी जीन्स व फॉर्मल कपडे, ब्लेजर्स, लग्नसराई साठी लागणारे नवरा नवरीचे कपडे, शालू, शरारा, लेडीज आणि जेंट्स साठीचे सर्व प्रकारचे शूज, चप्पल, सॅंडल अगदी साध्या पासून ते ब्रँडेड पर्यंत सर्वच प्रकारच्या वस्तू एका छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
आदित्य बिझनेस सेंटर या इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर महालक्ष्मी तथास्तु हे नवे दालन महालक्ष्मी परिवाराने सुरू करून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सोय सुद्धा केलेली आहे. संपूर्ण दालन हे वातानुकूलित आहे. महालक्ष्मी परिवारातील सर्व सदस्यांनी ग्राहकांशी जोडलेले आपुलकीचे नाते आणि विश्वास यामुळे महालक्ष्मी परिवाराकडे खरेदीसाठी नेहमीच गर्दी असते.
श्री.कांता कोडल्याळ यांच्या महालक्ष्मी परिवाराचे दोन मजबूत खांब म्हणजे श्री. विनायक कोडल्याळ व श्री. राम कोडल्याळ… अनेक कल्पना, दिवसा रात्री पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरताना महालक्ष्मी परिवाराचा आजपर्यंतचा प्रवास खरोखरच स्वप्नवत झालेला असून “महालक्ष्मी तथास्तुच्या” निमित्ताने त्यांनी मिळवलेले यश म्हणजे शिखर सर करण्यासारखेच आहे…! आजपर्यंत महालक्ष्मी परिवाराकडून सावंतवाडी शहरात सर्वोत्तम ग्राहक सेवा मिळालेली असून भविष्यातही त्यांच्याकडून सावंतवाडी शहरात उत्तम उत्तम ग्राहक सेवा मिळेल अशी खात्री आहे.
*महालक्ष्मी परिवाराच्या भावी वाटचालीसाठी संवाद मीडियाकडून शुभेच्छा…*