⁴मुंबई विरार येथील श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ चे भजनी बुवा व गायक सन्माननीय श्री योगेश मेस्त्री यांची यावर्षीची गुरुपौर्णिमा भजनी क्षेत्रात आदर्शवत ठरत आहे
श्री योगेश मेस्त्री यांनी ** हरी नामाची शाळा** या नावाने विरार, दहिसर, मालाड येथे भजन शिक्षणाचे वर्ग चालु केले आहेत व या वर्गात भजनाचे शास्त्रीय संगीत शिक्षण दिले जाते या वर्गात वयाच्या ५ व्या वर्षांपासून अगदी वयाच्या ६० वर्षे असणारी विद्यार्थी भजनाचे शिक्षण घेत आहेत,
श्री योगेश मेस्त्री यांनी यांनी आपल्या विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गुरुपौर्णिमा निमित्ताने संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले हि संकल्पना राबविणारे किंबहुना पहिलेच भजनी बुवा असावेत
या संकल्पनेमुळे मेस्त्री बुवांचे भजन क्षेत्रात कौतुक केले जात आहेत
या स्पर्धेत एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली या स्पर्धेत तीन गट करण्यात आले होते
पहिला अभंग स्पर्धा दुसरा नवीन विद्यार्थी व तिसरा जुने विद्यार्थी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पखवाज विशारद ह.भ.प.श्री संदिप सकपाळ महाराज यांनी परीक्षक म्हणून भुमिका पार पाडत असताना अचुक मुल्यमापन करुन विजेत्यांची नावे घोषित केली व सन्मान चिन्ह देऊन विजेत्यांचे अभिनंदन केले
श्री सकपाळ महाराज यांच्या भैरवी गायनाने कार्यक्रमाची रंगत अजून वाढवली शेवटच्या टप्प्यात गुरुवर्य बुवा श्री योगेश मेस्त्री व श्री सकपाळ महाराज यांचे सर्व शिष्यांनी गुरुपुजन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
हरी नामाची शाळा भजन स्पर्धा २०२२ निकाल खालीलप्रमाणे
मोठा गट:
१. विकास नाईक.
२. अरुण ताम्हणकर.
३. उदय साळवी.
४. प्रदीप महाडेश्वर.
नवोदित गट:
१. साक्षी कुडपकर.
२. अथर्व गावडे
३. परशुराम वारिक
४. प्रफुल्ल शेलार.
अभंग गट
१. प्रतिक पवार.
२. ज्ञानेश मेस्त्री.
३. अरविंद गावडे.
४. प्रतिक म्हाडगुत.