You are currently viewing बांदा शहरातील विजेच्या समस्या गणेश चतुर्थी पूर्वी सोडवा – बाबा काणेकर

बांदा शहरातील विजेच्या समस्या गणेश चतुर्थी पूर्वी सोडवा – बाबा काणेकर

भाजपाच्या वतीने विद्युत वितरणला निवेदन

बांदा

गणेश उत्सव काळात शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी केली आहे. दरम्यान प्रलंबित कामे चतुर्थी पूर्वी पूर्ण करून घ्यावीत, तसेच स्थानिकांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवाव्यात, कामात अडचणी येत असतील तर आम्ही सर्वतोपरी मदत करू, असेही त्यांनी सांगितले. याबाबत आज विद्युत वितरण चे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष साई सावंत, सुनील धामापूरकर, साईश सावंत, केदार कणबर्गी आणि हेमंत दाभोलकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा