प्रिय नितीन….
वाढदिवसाच्या शुभेच्छा💐💐
सहवास
सोबत जरी नसलास तरी,
आठवणींची साथ आहे.
हात निसटून गेला जरी,
मैत्रीत तुझा भास आहे.
आठवणींचे दिवस ते,
सोनेरी किरणे घेऊन येतात.
तांबडं फोडत अवकाशी,
निशेसह काळोख देऊन जातात.
स्मृती तुझ्या हृदयातील,
गालावर हास्य उमटवतात.
तू नसल्याची जाणीव होताच,
चेहऱ्यावरचे भाव बदलतात.
गेलास तू जिथे कुठे,
आनंदाची उधळण करत रहा.
कुटुंब, मित्र, सखे, सोबती,
जपतील स्मृती पाहत जा…
(दीपी)
दीपक पटेकर