You are currently viewing मनामनातील कृष्ण कन्हैय्या

मनामनातील कृष्ण कन्हैय्या

*लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.अचला धारप लिखित अप्रतिम ललितलेख*

*मनामनातील कृष्ण कन्हैय्या*

नटख कान्हाच्या त्या बाललीला..
त्याच ते मोरपीस लावलेलं मोहक बालरुप..त्याची ती दुडुदुडू चालणारी पावलं..सगळ्या गोकुळात चैतन्याचा वाहणारा झरा होता तो !
जरा मोठा झाल्यावर त्याचं ते गोपीकांच्या खोड्या काढणं..
हळुच दही, ताक, लोण्याची चोरी करणं..म्हणून तो माखनचोर म्हणून संबोधला जायचा. असा हा बाळकृष्ण सगळ्यांना फार आवडतो.
असा बाळकृष्ण देवघरात रोज पुजला जातो. त्याला आवडीचा लोण्याचा नैवेद्य दाखवला जातो.
मला मातृत्वाची चाहुल लागली आणि सासुबाईंनी सांगितल रोज त्या बाळकृष्णाला नमस्कार करुन प्रार्थना करं की आमच्या घरात पण बाळकृष्ण येऊ दे. तो दिवस आला..आमच्या घरात बाळकृष्ण आला…तो थोडा मोठा झाल्यावर त्याला बाळकृष्णा सारखा पोशाख करुन त्याच्या डोक्यावर मुकुट घालुन त्यात मोरपीस लावलं. आमचा हा बाळकृष्ण छान दिसतं होता. तो जेव्हा चालायला लागला..त्याची ती दुडुदुडू पावलं घरात फिरु लागल्यावर घराचं गोकुळ झाल्यासारखं वाटलं.
घरात जेव्हा ताक करायला ती मोठी रवी त्या दोरीमधुन फिरायला लागायची तसा हा आमच्या घरातला बाळकृष्ण तिथे यायचा.लोण्याचा गोळा येई पर्यंत कडेला नुसता दंगा सुरु असायचा. त्याला लोण्याचा छोटासा गोळा दिला की हा बाळकृष्ण खुश होयचा…बोट चाटत.. तो चेहरा लोण्याचे क्रिम लावुन सजायचा!
आजही जेव्हा कृष्णाची पुजा करुन त्याला लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवते तेव्हा त्याला प्रार्थना करते माझ्या बाळकृष्णाला खुश ठेव.

घरात कृष्ण
मनात कृष्ण
सांजसकाळी पुजते कृष्ण.

सौ. अचला धारप

प्रतिक्रिया व्यक्त करा