You are currently viewing वेंगुर्ले पोलीस “हाय अलर्ट”; किनारपट्टीवर बोटी व गाड्यांची कसून चौकशी…

वेंगुर्ले पोलीस “हाय अलर्ट”; किनारपट्टीवर बोटी व गाड्यांची कसून चौकशी…

वेंगुर्ले

हरेश्वर श्रीवर्धन येथे समुद्रकिनारी मिळून आलेल्या बोटीच्या अनुषंगाने, तसेच दिघी भरतखोल येथे लाईफ तराफा मिळाल्याचे अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व हॉटेल लॉजेस चेक करण्यात आलेली आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
वेंगुर्ला हद्दीतिल लँडिंग पॉईंट व कोस्टल पॉईंट येथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला असून समुद्रकिनारी असलेले सर्व हॉटेल/लॉजेस चेकिंग सुरू आहे. स्थानिक मच्छीमार, सगररक्षक दल सदस्य आणि वारडन याना देखील सतर्क करण्यात आलेले असून संशयित हालचाल दिसून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.
दरम्यान आम्ही स्वतः समुद्रातून येणाऱ्या बोटी बंदरावर चेक करीत आहोत. तसेच बोटीवर कामास असलेले खलाशी व बाहेरील राज्यातील इसम यांची चौकशी करीत आहोत.असे जाधव यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा