You are currently viewing राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग तालुकाध्यक्ष यांना नियुक्ती पत्रे

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग तालुकाध्यक्ष यांना नियुक्ती पत्रे

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग च्यावतीने जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
देवगड, वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ तालुका अध्यक्ष हे अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेल्यामुळे त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवून नियुक्ती पत्र स्वीकारले. दोडामार्ग, कणकवली, आणि वेंगुर्ला तालुका अध्यक्षांना येत्या आठवड्यात पत्र देण्यात येतील.
उपजिल्हाध्यक्ष म्हणून देऊ शंकर जाधव( दोडामार्ग ) यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीस म्हणून संतोष गणपत चव्हाण (वेंगुर्ला) यांची नेमणूक करण्यात आली. सर्व नियुक्तीपत्रे प्रांतिक सदस्य उदय भोसले व प्रदेश सरचिटणीस सुरेश गवस, अशोक पवार, सत्यजित धारणकर यांच्या हस्ते देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा