You are currently viewing नांदगाव येथील रखडलेला सर्व्हिस रस्त्याचे काम अखेर मार्गी लागणार..

नांदगाव येथील रखडलेला सर्व्हिस रस्त्याचे काम अखेर मार्गी लागणार..

प्रांताधिकारी वैशाली राजमाने व महामार्ग प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांचे लेखी आश्वासन..

कणकवली

नांदगाव येथील रखडलेला सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी असलेल्या दाव्याचे काम महिन्याभरात मार्गी लावले जाईल, तसेच महसूल विभागाच्या संबंधित काही समस्या असल्यास त्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तर महामार्ग प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिले.

नांदगाव बिडयेवाडी येथील पुराचे पाणी घरात घुसून नागरिकांचे नुकसान होते, त्या ठिकाणी मोरीचे काम प्रस्तावित केलं असून काही महिन्यांत मार्गी लावले जाईल, असे आश्वासन लेखी सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांना देण्यात आल्याने तिसऱ्या दिवशी १७ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेतले. यावेळी लेखी पत्र नागेश मोरये यांना देण्यात आले. येत्या

तर केसीसी बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून खालील कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील, त्यामध्ये नांदगाव बिडयेवाडी येथील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरीचे काम पुढील पावसापूर्वी केलं जाईल. कोळंबा मंदिर ते खानोलकर घरापर्यंत संपूर्ण गटाराचे काम केलं जाईल.

तर केसीसी बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून खालील कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील, त्यामध्ये नांदगाव बिडयेवाडी येथील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरीचे काम पुढील पावसापूर्वी केलं जाईल. कोळंबा मंदिर ते खानोलकर घरापर्यंत संपूर्ण गटाराचे काम केलं जाईल.

ओटव फाटा येथील सर्व्हिस रस्त्यालगत मोरी व संरक्षण भिंत करुन दिलं जाणार आहे. तसेच ओटव फाटा येथील पावसाळ्यात सर्व्हिस रस्त्यावर येत असलेल्या पुराच्या पाणी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. प्राथमिक शाळा नांदगाव समोरील गटार व्यवस्था केल्या जातील. तसेच सर्व्हिस रस्ते व अन्य पुढील कामे उपोषणकर्ते नागेश मोरये यांच्या सूचनेनुसार कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेतल्याचे श्री. नागेश मोरये यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, महामार्ग अधिकारी शिवनीवार, तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, केसीसी बिल्डकॉचे श्री. पांडे, पोलीस किरण, सागर मासा, नायब तहसीलदार एम. आर. नाईक, असलदे माजी सरपंच दिपीप फोडके, सुनील आबेरकर, पंढरीनाथ पारकर,पत्रकार भगवान लोके, श्यामसुंदर मोरये, राजा म्हसकर, भाई मोरजकर, नीरज मोरये,राजू खोत, नारायण मोरये, मारुती मोरये, शशिकांत शेट्ये, अशोक बिडये, विजय म्हाडेश्वर, संदीप नांनचे,धोडु पाटील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा