You are currently viewing उभादांडा येथील रक्तदाते सनी रेडकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…

उभादांडा येथील रक्तदाते सनी रेडकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…

वेंगुर्ले

उभादांडा-सिध्देश्वरवाडी येथील रहिवासी आणि सिंधु रक्तमित्र परीवारातील रक्तदाते संतोष आपा रेडकर उर्फ सनी रेडकर (48) यांचे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने अकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, भाऊ असा परीवार आहे. सिंधुदुर्ग जिह्यात सनी रेडकर या नावानेच त्यांना ओळखले जात होते.

सिंधु रक्तमित्र परीवारातर्फे ज्याज्या वेळी रक्तदानाचे शिबीर आयोजीत केले जायचे त्या त्या वेळी त्यांना रक्तदान केलेले होते. सिंधुमित्र परीवारातर्फे त्यांच्या या अकस्मित मृत्यूबाबत हळहळ व्यक्त होत आहे. तसेच सनी रेडकर यांच्या अकस्मित निधनाबद्दल वेंगुर्ले तालुक्यात हळहळ व्यकत होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा