कुडाळ :
“परमेश्वर भेटीचा राजमार्ग रुग्णसेवेतूनच जातो. नर्स पेशा मानव जातीची सेवा करण्याचा राजमार्ग आहे. सहृदयतेने केलेली रुग्ण सेवा परमेश्वर पूजेसारखीच आहे”. असे उद्गार नानावटी रुग्णालयाच्या नर्स सुप्रीडेंट शलाका यशवंत सावंत -परब यांनी काढले. त्या बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या सांगता समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
त्यानी आपल्या पुढील मनोगतामध्ये नर्सेस चे कार्य हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांनी इतकेच महत्त्वाचे आहे. सैनिक सीमेवर शत्रू सैन्याशी लढत असतात तर नर्सेस रुग्णावर हल्ला करणाऱ्या रोगांशी लढत असतात व समाजाला वाचवत असतात. हे सांगत आपण नर्स असल्याचा आपणास अभिमान आहे हे सांगत जनसेवेची सेवा करण्याची सुसंधी या पेशांमध्ये लाभत असते. त्याचा सकारात्मकतेने स्वीकार करा आनंदी व्हाल. असे सांगत बॅ.नाथ पै शिक्षण संस्था व त्यांचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक जे कार्य केलेले आहे त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली. शलाका सावंत व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विविध अभ्यासक्रमांतर्फे देशभक्तीपर स्फूर्ती गीते व समुहनृत्य सादर केले. विशेष म्हणजे १३,१४ व१५ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या ध्वजारोहणामध्ये सीबीएसई सेंट्रल स्कूलचा बारावीमध्ये प्रथम आलेला समिप शिंदे, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यीनी मृण्मयी खानविलकर, नर्सिंग महाविद्यालय ची ऋग्वेदा राऊळ या विद्यार्थ्यांच्या हस्ते.ध्वजारोहण करून बॅ. नाथ पै.शिक्षण संस्थेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला गेला. प्रज्ञावंत, बुद्धिवंत विद्यार्थी ही कोणत्याही शिक्षण संस्थेची संपत्ती असते. याचे उचित भान ठेवून बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या संकल्पनेतून दहावीच्या, बारावीच्या बोर्डामध्ये व पदवी परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांच्या शुभ हस्ते शिक्षण संस्थेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. या त्यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून पालक वर्गातून आनंद व्यक्त केला जात असून त्यांचे अभिनंदन केले जात आहेत. अशाच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांच्या यशावर शिक्षण संस्थेचे मूल्यमापन केले जातात. त्याच विद्यार्थ्यांना केंद्रभूत ठेवून त्यांच्या हस्ते अशा पद्धतीने ध्वजारोहण केलं गेलं तर त्यांना प्रेरणा मिळतेच व त्यांच्याबरोबर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळू शकते. असा एक वेगळा आदर्श या निमित्ताने त्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.