You are currently viewing ‘सोन्याचा नारळ’ विजेता चषकच्या मानकरी प्रियांका लाड यांच्यावर सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव

‘सोन्याचा नारळ’ विजेता चषकच्या मानकरी प्रियांका लाड यांच्यावर सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव

वैदेही जाधव उपविजेत्या; मनीषा जाधव, भारती आचरेकर उत्तेजनार्थ; सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या भव्यदिव्य नारळ लढविणे स्पर्धेला हजारोंच्या संख्येने प्रतिसाद..

 

मालवण :

भव्यदिव्य स्वरूपात आयोजित होणारी मालवण येथील सर्वाधिक मोठ्या बक्षीस रक्कमेची महिलांची जिल्हास्तरीय नारळ लढवणे स्पर्धा शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने भरड दत्तमंदिर येथे मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेला हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रियांका लाड या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. त्यांना अस्सल सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याची तीन नाणी, पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.

 

दरम्यान, उपविजेत्या वैदेही जाधव यांना सोन्याची नथ व सोन्याचे नाणे तर मनीषा जाधव व भारती आचरेकर यांना चांदीचा दिवा देऊन उत्तेजनार्थ म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. श्वेता शेखर तोडणकर या लकी ड्रॉ च्या मानकरी ठरल्या. स्पर्धेला आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

आमदार वैभव नाईक यांनी शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीचे विशेष कौतुक केले. सतत जनतेत राहून काम करणारी ही माणसे खऱ्या अर्थाने जनसेवा करत आहेत. महिलांसाठी नारळ लढवणे ही स्पर्धा आज सर्वत्र खेळवली जाते. मात्र आठ वर्षांपूर्वी या स्पर्धेची मालवणात मुहूर्तमेढ रोवून या स्पर्धेच्या माध्यमातून शिल्पा खोत यांनी महिलांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले. महिलांचे स्वराज्य ढोल पथकही शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतून उभे झाले.

आज जिल्ह्यातच नव्हे तर जिल्हा बाहेरही या ढोल पथकाचा नावलौकिक आहे. यासह रक्तदान सेवेच्या माध्यमातून शिल्पा खोत सतत कार्यरत असतात. सामाजिक सेवेची मोठी आवड असलेले हे शिल्पा खोत व यतीन खोत हे दाम्पत्य आहे. असे कौतुकोद्गार आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.

स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ योग साधका जयश्री हडकर यांच्या हस्ते झाले. वृंदा मोरे व स्मृती कांदळगावकर यांच्या हस्ते शुभरंभाचा नारळ लढवून स्पर्धेची सुरवात झाली. यावेळी जेष्ठ नागरिक देवदत्त हडकर, जेष्ठ नागरिक पद्मजा वझे आई, परशुराम खोत, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे बाबी जोगी, मंदार केणी, मंदार ओरसकर, महेश जावकर, नितीन वाळके, किरण वाळके, भाई कासवकर, नरेश हुले, सिद्धू जाधव, मनोज मोंडकर, अमेय देसाई, उमेश मांजरेकर, प्रकाश करंगुटकर, बंड्या सरमळकर, सेजल परब, शिला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, अंजना सामंत, दीपा शिंदे, नंदा सारंग, चारुशीला आढाव, स्मृती कांदळगावकर, वृंदा मोरे, रूपा कुडाळकर, माजी सभापती सोनाली कोदे, महानंदा खानोलकर, माई चिंदरकर, लायन्स क्लब अध्यक्ष वैशाली शंकरदास, अनुष्का चव्हाण, अंजली आचरेकर, पूजा वेरलकर, स्वाती तांडेल, अश्विनी आचरेकर, कृपा कोरगावकर, प्राजक्ता गांगनाईक, पूजा तळाशीलकर, अक्षय भोसले आदींसह विविध मान्यवर, स्वराज्य ढोल पथक सर्व सदस्य उपस्थित होते. मालवणी सूत्रसंचालक बादल चौधरी यांच्या दमदार समालोचनाने स्पर्धेची रंगत अधिकच वाढली.

स्पर्धेच्या निमित्ताने आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच महिलांचा प्रातिनिधिक सन्मान यावेळी करण्यात आला. यात डॉ. गार्गी ओरसकर, मच्छी विक्रेत्या महिला प्रतिनिधी मनीषा जाधव, शिक्षिका श्वेता यादव, शिक्षिका शुभांगी खोत यांना डॉ. मालविका झांटये, डॉ. शिल्पा झांटये, महाविद्यालय प्राचार्य उज्वला सामंत, पोलीस उपन प्रतिज्ञा खोत आदी मानवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

स्पर्धे दरम्यान भरड येथील बाल चमुनी सामाजिक संदेश देणारे पथनाट्य सादर केले. तर अहाना तळाशीलकर हीच नृत्याविष्कार सादर झाला. तर तुषार म्हापणकर यांचा कोंबडा व तात्या विंचू नृत्य आकर्षक ठरले. तर वालावल येथील तत्परा चौधरी व सोहम चौधरी यांचे सोलो ढोल ताशा वादन लक्षवेधी ठरले.

एकूणच या रंगारंग सोहळ्या दरम्यान विविध गटात स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत प्रेक्षकांची संख्या लक्षवेधी ठरली. स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी व्यसपीठावर अत्यंत चुरशीच्या पध्दतीने झाली. यात प्रियांका मिलिंद लाड या विजयी ठरल्या. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. दत्तमंदिर मंडळाच्या सहकार्यातून स्पर्धा यशस्वी झाली.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नितीन तोडणकर, प्रवीण रेवंडकर, सायली कांबळी, रूपा कुडाळकर, पूजा तळाशिलकर, प्रतिभा चव्हाण, अमेय देसाई, मंदार ओरसकर, करण खडपे यांनी काम पाहिले.

नागरिक महिला या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी ठरते. ही स्पर्धा मालवण वासीयांना आपली वाटते त्यामुळेच स्पर्धेला सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभतो. हेच या स्पर्धेचे यश आहे. असे शिल्पा खोत यांनी स्पष्ट करत सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा