You are currently viewing सावंतवाडीतील म्युझिक कॉर्नरच्या दुसऱ्या सुसज्ज दालनाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन…

सावंतवाडीतील म्युझिक कॉर्नरच्या दुसऱ्या सुसज्ज दालनाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन…

“हर घर वॉशिंग मशीन” ऑफर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद; कॅबिनेट मंत्री केसरकरांकडूनही शुभेच्छा…

सावंतवाडी

येथील विठ्ठल मंदिर नजीक दुर्वांकुर निवासात नव्याने सुरू करण्यात आलेल्या “म्युझिक कॉर्नर” च्या दुसऱ्या सुसज्ज दालनाचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर मोठ्या दिमाखात करण्यात आला. याप्रसंगी श्रीमती उमा शंकर हावळ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त दालनाच्या माध्यमातून “हर घर तिरंगा” अभियानाच्याच पार्श्वभूमीवर “हर घर वॉशिंग मशीन” या योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत सावंतवाडी शहरात म्युझिक कॉर्नरचे हे नवे दालन ग्राहकांना “फलदायी” आहे, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध ऑफर्स व खरेदीचा लाभ घेतला.
याप्रसंगी म्युझिक कॉर्नरचे मालक राजन हावळ, रितेश हावळ, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, सारस्वत बँकेचे मिलिंद फडणवीस आदींसह सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवार यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
गेली अनेक वर्षे दर्जेदार सेवा देणाऱ्या “म्युझिक कॉर्नर” चे आता शहरात दुसरे सुसज्ज दालन सुरू करण्यात आले आहे. या दालनाचा शुभारंभ नुकताच पार पडला. यानिमित्त दालनाच्या माध्यमातून देण्यात आलेली “हर घर वॉशिंग” मशीन ऑफर्स ग्राहकांसाठी आकर्षण ठरली. या योजनेच्या माध्यमातून स्मार्ट एलईडी टीव्हीवर थेट वॉशिंग मशीन मोफत देण्यात आली. त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी दालनात मोठी गर्दी केली होती. तर इतर इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीवर सुद्धा ग्राहकांना हमखास भेटवस्तू आणि भरघोस सूट देण्यात आली. त्यामुळे सर्व सामान्य प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. तसेच प्रत्येक उपकरणांना वॉरंटी सहित विश्वसनीय सेवा देण्यात आली. ही ऑफर आणखी काही दिवस सुरू राहणार असून केवळ ५०१ रुपये भरून सुद्धा ग्राहकांना बजाज फायनान्स च्या माध्यमातून आवश्यक उपकरणे खरेदी करता येणार आहेत. तर या दालनात एसी, कुलर, वॉशिंग मशीन, सर्व प्रकारच्या टीव्ही, फ्रिज, ओव्हन, साऊंड सिस्टिम, डिश टीव्ही सेटअप तसेच विविध इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपलब्ध आहेत. तरी जास्तीत-जास्त ग्राहकांनी सेवेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी 7719918722 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन हावळ बंधूंनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा