You are currently viewing जिल्ह्यातील भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी –  संदेश पारकर….

जिल्ह्यातील भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी – संदेश पारकर….

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करणार मागणी

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील भातशेतीचे पंचनामे करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली.

काही दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जात आहे. कापणीला आलेल्या भातपिकाची धुवाधार पावसामुळे नासाडी होत आहे. त्यातच रविवारी सायंकाळी पुम्हा एकदा पावसाने जोर धरला.

सिंधुदुर्गात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शिवसेना नेते संदेश पारकर यांनी रविवारी देवगड, कणकवली तालुक्याचा दौरा केला. यावेळी महिला जिल्हाप्रमुख निलम सावंत, माजी जि. प. सभापती संदेश सावंत सोबत होते. दौऱ्यादरम्यान पारकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्यावर कोसळलेल्या आस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. भातशेती हे सिंधुदुर्गातील प्रमुख पीक असून सध्या भातकापणीचा हंगाम सुरु असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा