सावली प्रकाशन समूह संस्थापक पत्रकार, लेखक, कवी सचिन पाटील यांची स्वरचित कविता
आजची तरुणपिढी
उभारते गुढी नाविण्याची
विकासाची सुरुवात होता
येई अनुभूती प्राविण्याची ||१||
जिद्द धरूनिया मनात
आजची तरुणपिढी चाले
विज्ञानाची कास धरताना
आयुष्य प्रकाशमान झाले||२||
स्वामी विवेकानंद घडविती
आदर्शवत युवा वर्गाला
कणखर मनगट बाळगता
सामर्थ्य लाभे जीवनाला||३||
जडणघडण व्हावी अशी
मानवतेला मनी धरून
ध्येयाप्रती वाटचाल सुरू
ईश्वराला मनी स्मरून||४||
वाचनवेडी तरुणपिढी
निर्माण करते नव पर्व
आशावाद जपून उराशी
जग आता जिंकेल सर्व||५||
आजची तरुणपिढी
समर जिंकेल आयुष्याचे
कष्टात आहे सामावले
सुयश ज्याचे त्याचे||६||
*सचिन शंकर पाटील*
*(अलिबाग, रायगड)*
*मो:९२०९५७९३३५*