मालवण :
खरारे पेंडूर ग्रामपंचायतला महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग महा आवास अभियान पुरस्कार २०२१-२२ राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पुरस्काराने गौरवण्यात आले.
महाआवास अभियान २.० अंतर्गत विविध उपक्रम माध्यमातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत या प्रकारात द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत खरारे पेंडूर ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच सुनीता मोरजकर, उपसरपंच विवेक जबडे, ग्रामविकास अधिकारी कोठावळे, ग्रामसेवक निकम व ग्राम प. सदस्य सुमित सावंत यांनी सन्मान स्वीकारला.