परुळे :
परुळे येथील कुशेवाडा येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा झाला. देशाचा 75वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत गावात राष्ट्रध्वज देण्यात आले. त्याचबरोबर घरी झेंडा फडकवताना पाळावयाचे नियम याबाबत माहिती पत्रक देण्यात आले. शाळा, अंगणवाडी यामधून विविध उपक्रम घेण्यात आले. प्रभातफेरी तसेच देशभक्तीपर नृत्यस्पर्धा, प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम घेण्यात आले. अंगणवाडीत गोपाळ पंगत घरो घरी पोषण उपक्रम राबविण्यात आला. सैनिक किंवा त्यांच्या कुटंबियाचा सन्मान करण्यात आला. कुशेवाडा गावचे सुपुत्र महाविर चक्र विजेते कप्तान कै. मोहन सामंत यांच्या स्मृती जगविण्यात आल्या. यावेळी मुलांनी विविध वेशभूषा करून मानवंदना दिली. स्वातंत्र्यदिना दिवशी ग्रामपंचयतीत मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेच्या मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली.