युवा पिढीला जेष्ठांनी दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद ! – सुरेश ठाकूर
मालवण (मसुरे) :
हडी गावातील जेष्ठ नागरिक संघाने गावातील भावी पिढीला दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद आहे. जीवनात वेळेला महत्व ध्या.जेष्ठ ग्रामस्थांनी चिंता सोडून मन नेहमी प्रफुल्लित आणि आरोग्य निरोगी ठेवावे. गुणवंत विध्यार्थ्यांनी कर्तव्याची जाणीव ठेवून गावाचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन साने गुरुजी कथामाला मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी हडी येथे केले.
फेसकॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, शालेय परीक्षेतील ५० गुणवंत विध्यार्थ्यांचा गुणगौरव हडी शाळा सभागृहात करण्यात आला. यावेळी अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, माजी सभापती उदय परब, माजी सरपंच प्रकाश तोंडवळकर, सौ. श्रुती गोगटे, सोनाली कदम, दिलीप करंदीकर, पुजा तोंडवळकर, दिनेश सुर्वे सुरेश भोजणे, उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव रमाकांत सुर्वे, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, कोषाध्यक्ष मोहन घाडीगांवकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरेश ठाकूर यांनी मराठी भाषेतील म्हणी व वाक्प्रचार याबाबत संदर्भासह माहिती यावेळी दिली. उदय परब म्हणाले, हडी जेष्ठ नागरिक संघाचे कार्य, विविध उपक्रम कौतुकास्पद असतात. माजी सचिव चंद्रकांत पाटकर यांचे संघासाठी मोलाचे योगदान लाभत आहे. संघाने अशाच प्रकारे पुढील काळात कार्यक्रम राबवावे.साने गुरुजी कथामाला अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या बद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. चंद्रकांत पाटकर यांनी प्रास्ताविकात जास्तीत जास्त जेष्ठ ग्रामस्थांनी संघाचे सदस्य होऊन संघ आणखी बळकट करूया असे आवाहन केले व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सदस्य प्रभाकर चिंदरकर, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर, रमेश कावले, गणु परब,श्रीधर परब, रामदास पेडणेकर गणेश परब, सौ मनिषा पोयरेकर सौ प्रज्ञा तोंडवळकर, सौ. वनिता हडकर, यशवंत शेट्ये, देऊ भोजने, आरोग्यसेविका सौ.वाघ आदी उपस्थित होते. आभार संघाचे सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी मानले.