संवाद मीडियाला अचूक बातमी मिळते कशी? या शोधात जुगाराचे बादशाह..
जिल्ह्यात जुगाराचे अड्डे दिवसेंदिवस वाढत आहेत. रोज बसणाऱ्या बैठकांची माहिती संवाद मीडियाला पोलिसांच्या अगोदर मिळत असल्याने जुगाराची बैठक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरत आहे. काल कणकवलीतील एका बंदिस्त हॉटेलमध्ये सुरू असलेली बैठक संवाद मीडियाने बातमी दिल्यामुळे जणू काय सुनी सुनी झाली. बैठक आटोपती घेऊन चिंतेत असलेले विठ्ठल विठ्ठल जप करणारे फोंडेकर आणि कणकवलीचे टिंगल कॉन्तेरे यांनी आज कणकवलीत जुगाऱ्यांची मिटिंग बोलावली आणि संवाद मीडियाला आपल्या बैठकींच्या जागा संदर्भात कशी काय माहिती मिळते? याचाच शोध सुरू केला आहे, तोपर्यंत पुढील बैठका तहकूब ठेवल्या आहेत.
कणकवलीत आज झालेल्या मिटिंगमध्ये जुगाऱ्यांच्या बैठकीच्या अड्ड्याची माहिती एलसीबी ला नसते, पोलीस स्टेशनला नसते परंतु अचूक माहिती संवाद मीडियाला कशी मिळते यांच्यावरच चिंतन झाले आणि प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहे. लाईव्ह बातम्या देणाऱ्या मीडियाच्या एका प्रतिनिधीने तर या जुगाऱ्यांकडून संवाद मीडियामध्ये बातम्या येणार नाहीत, त्या आपण बंद करतो अशा बोलीवर २०००० रुपये उकळल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे.
काही राजकारणी लोक सुद्धा फोंडयाच्या विठ्ठल जप करणाऱ्या आणि कणकवलीतील टिंगल कोंतेरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात राजकारणासाठी देखील रक्कम उधार घेतात. आणि काही नावाजलेले राजकीय लोक स्वतःसुद्धा जुगाराच्या अड्ड्यांवर बैठकीला बसतात, त्यामुळे जुगाऱ्यांना राजकीय आश्रय देखील सहजच मिळत असतो.
कणकवली व फोंडा येथे सुरू असलेल्या बैठका संवाद मीडियामध्ये अचूक बातम्या येत असल्याने काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या आहेत. बैठक बंद ठेऊन संवाद मीडियाला बातम्या कशा मिळतात याचेच शोधकार्य जोरात सुरू आहे.