सांगली:
हणमंत वडीये ता. कडेगांव येथे उपसरपंच श्री. विक्रम मोरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण करण्यात येऊन येरळामाई जनसहयोग फाउंडेशन, हणमंत वडिये या संस्थेच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत हणमंत वडीये येथे भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
१५ ऑगष्ट २०२२ या दिवशी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गावातील प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत गावात प्रभातफेरी काढण्यात आली.
त्यानंतर प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांमध्ये भाषणे करून स्वातंत्र्य दिनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
येरळामाई जनसहयोग फाउंडेशन, हणमंत वडिये या संस्थेच्या वतीने प्रत्येक इयत्तेतील वार्षिक परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शालेय उपयोगी वस्तू बक्षिस म्हणून देण्यात आल्या. तसेच संस्थेच्या व ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
प्राथमिक मराठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जाधव सर यांनी येरळामाई जनसहयोग फाउंडेशन, हणमंत वडिये या संस्थेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल संस्थेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले व संस्थेच्या उभारणीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य अनुक्रमे श्री. संकेत जाधव, श्री. इंद्रजीत मोरे, श्री. अरुण कोकरे तसेच पोलिस पाटील श्री. अंकुश पाटील, सन्मानीय श्री. आण्णासाहेब पिसाळ, श्री.जयराम मोरे, डॉ. श्री. विवेकानंद मोरे, श्री. मनोज मोरे, श्री. शाहिर मंडले, श्री. प्रतापराव मोरे, संस्थेचे खजिनदार श्री. प्रदीप मस्के, संस्थेचे सचिव श्री. सुभाष मंडले तसेच गावातील जेष्ठ, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते