You are currently viewing वामनराव महाडीक महाविद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा

वामनराव महाडीक महाविद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा

*वामनराव महाडीक महाविद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा*

*तळेरे महाविद्यालयात वाहतूक पोलीस निरीक्षक व सहकाऱ्यांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन*

*भगिनींनी राखी बांधून संरक्षण करण्याची केलेली मौन इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट पोलीस सदैव कटीबद्ध* – वाहतूक पोलीस निरीक्षक अरूण जाधव

*कायदे आणि पोलीस महिलांच्या समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी, सरंक्षणासाठी सदैव तत्पर*- वाहतूक पोलीस निरीक्षक अरूण जाधव

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरे येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला . कार्यक्रमाची सुरूवात झाडाला राखी बांधून करण्यात आली. तसेच देशाच्या रक्षणासाठी , समाजात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या आपल्या सैनिकांना , पोलीस बांधवांना विद्यार्थीनींकडून आदरपूर्वक राख्या याप्रसंगी बांधण्यात आल्या. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सिंधुदुर्गचे जितेंद्र तिवारी , मंजूनाथ ,वाहतूक पोलीस निरीक्षक अरूण जाधव , सहायक पोलीस राजेश ठाकूर , अमोल गोसावी , हेमंत धुरी, कॕलीस डिसुझा , सुरेश सावंत , अभि तांबे, चंद्रकांत वागतकर , शाळा समिती सदस्य प्रविण वरूणकर , सुनिल तळेकर चॕरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशभाऊ तळेकर , माजी सरपंच तथा माजी शाळा समिती सदस्य चंद्रकांत तळेकर , प्राचार्य अविनाश मांजरेकर , सहायक शिक्षिका डी.सी. तळेकर, एन्.बी.तडवी , ए.बी. कानकेकर , पी.एन्. काणेकर , पी.एम् . पाटील , एन.पी. गावठे , व्ही.डी. टाकळे , एस.एन.जाधव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.
वाहतूक पोलीस निरीक्षक अरूण जाधव याप्रसंगी बोलताना म्हणाले. भाऊ बहिण्याच्या पवित्र नात्यांचा हा सण यादिवशी भगिनींनी राखी बांधून संरक्षण करण्याची केलेली मौन इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही महाराष्ट पोलीस सदैव कटीबद्ध आहोत .कायदे आणि पोलीस महिलांच्या सरंक्षणासाठी आहेत , तोपर्यंत या स्वतंत्र भारतामध्ये महिला भगिनींनी भिती न बाळगता यशाची नवनवीन शिखरे गाठण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे.


आज मुख्याध्यापक, प्रशालेच्या विद्यार्थीनीं भगिनी , शिक्षकांनी केलेल्या स्वागताने , आदरतिथ्याने भारावून गेल्याचे ५८ महाराष्ट्र बटालीयन सिंधुदुर्ग चे जितेंद्र तिवारी म्हणाले.तर राखीपौर्णिमे निमित्त भगिनीनीं बांधलेल्या विश्वासाच्या , संरक्षणाच्या धाग्याला जपण्यासाठी नेहमिच प्रयत्नशिल असल्याचे ५८ महाराष्ट्र बटालीयन सिंधुदुर्ग चे मंजूनाथ म्हणाले.

.
याप्रसंगी प्राचार्य अविनाश मांजरेकर यानींही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्युनिअर काॕलेजचे सर्व प्राध्यापक , विद्यार्थीनींनी मेहनत घेतली. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस बांधवाकडून सर्व विद्यार्थ्यांना राखीपौर्णिमेनिमित्त गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलान एन.पी.गावठे तर आभार पी.एम.पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा