You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा 

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा 

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये आज १५ ऑगस्ट २०२०- सोमवार, या दिवशी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. या सुवर्ण दिना- दिवशी शाळेचे संचालक आदरणीय श्री. रुजूल पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मदतनीस व सर्व विद्यार्थ्यांनी मिळून ध्वजवंदन करून ध्वजगीत सादर केले. त्याचप्रमाणे, या ७५ व्या स्वातंत्र्य- दिनाची सुवर्णसंधी साधून शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. दि. ११ ऑगस्ट २०२२ या दिवशी राखी तयार करणे, दि. १२ ऑगस्ट २०२२ या दिवशी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच, ‘ हर घर तिरंगा अभियान’ निमित्ताने दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी शाळेतर्फे दोनशे (२००) ध्वजवाटप करण्यात आले.


तर, आज दि. १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी देखील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अनुक्रमे इ. १ ली साठी ‘ एकता आणि विविधता’ या विषयावर , इ. २ री साठी ‘ राष्ट्रीय चिन्ह’ या विषयावर तर इ. ३ रीच्या विद्यार्थ्यांसाठी हाऊस गटांप्रमाणे देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्य स्पर्धा व इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी हाऊस गटांप्रमाणे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे संचालक आदरणीय श्री. रुजूल पाटणकर व सौ. काश्मिरा पाटणकर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीशा कामत तसेच, नृत्य स्पर्धा कार्यक्रमाचे परीक्षक श्री. महेश जांभोरे, गायन स्पर्धा कार्यक्रमाचे परीक्षक श्री. दीनानाथ मिशाल, वेशभूषा कार्यक्रमाचे परीक्षक श्री. मनीष सावंत व श्री. सावन जांभोरे या सर्वांचे फुलदाणी देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, इ. ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून स्वातंत्र्यदिनाविषयी
माहिती सादर केली. स्पर्धे करिता आलेल्या परीक्षकांनी देखील आपली मते व अनुभव मांडले. शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अशाप्रकारे, भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती देणाऱ्या सर्व देशपुत्रांच्या स्मरणाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील ७५ व्या स्वातंत्र्य- दिन अमृतमहोत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला गेला.

प्रतिक्रिया व्यक्त करा