मुंबई
७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी देशाला आत्मनिर्भरतेने पुढे घेऊन जाण्यासाठी निश्र्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शिवाई विद्यामंदिर शाळेच्या उपसचिव डॉ.रंजना तामोरे यांनी व्यक्त केला. भांडुपगाव येथील शाळेच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण डॉ.तामोरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी शिवाई विद्यामंदिर शाळेच्या सचिव गौरी भोईर, माजी नगरसेविका सारिका पवार, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक जनार्दन गोळे , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा ताजणे, पर्यवेक्षक रत्न भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका आशा ताजणे यांनी राष्ट्रप्रेम मनामनात अखंड तेवणारा नंदादीप असून तेवत ठेवण्याचा प्रयत्न करा असे विद्यार्थीना आवाहन केले. माजी नगरसेविका सारिका पवार यांनी आणखी पंचवीस वर्षांनी देशाला बरोबर शंभर वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी सुद्धा आजच्या इतकीच आस्था आणि प्रेम दिसू द्या! यातूनच शाळेचे नावलौकिक होण्यासाठी अथक परिश्रम घेण्याचे सूतोवाच केले. जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर म्हणाले की, स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षांचा टप्पा पूर्ण होत असला तरी स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि देशाप्रती आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे बलिदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही. देशाने आजपर्यंत साध्य केलेल्या प्रगतीत प्रत्येक नागरिकांने योगदान दिले असल्याचे नमूद केले. यावेळी अश्र्विनी कानोलकर, सुरेखा उजगरे, पूजा संसारे , तनुजा भाये, प्रिया कोरगावकर, आयरे या शिक्षकांनी गायलेल्या ‘ उंच उंच तिरंगा डोलाने फडकतो , या देशभक्तीगीताने उपस्थितीना मंत्रमुग्ध केले. शाळेची चौथीची विद्यार्थीनीं साक्षी गाडे आणि शिक्षक कैलास गुंजाळ यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव इतिहास व नेत्रदीपक कामगिरी यावर विचार मांडले. शिवाई विद्यामंदिर शाळेच्या सचिव गौरी भोईर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. या रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रिया कोरगावकर यांनी अतिशय सुबक शब्दात केले.