सावंतवाडी :
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा चे आयोजन गावापासून ते शहरांपर्यंत करण्यात आले होते. या महोत्सवला सर्वच स्तरातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. माजी सैनिक आणि सैन्यात राहून केलेले देशाचे रक्षण आणि देशाची सेवा या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सैनिक म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी माजी सैनिक कै. सिताराम गावडे यांच्या पत्नी श्रीमती रंजना सिताराम गावडे यांच्या हस्ते आज 15 ऑगस्ट रोजीचे ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रंजना गावडे यांना ग्रामपंचायत कडून गावाच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने निवृत्त पोलिस अधिकारी व जेष्ठ नागरिक बापू नाईक यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मळेवाड राणी पार्वतीदेवी शाळा नंबर 1च्या विद्यार्थ्यांनी समूह गीत, देशभक्तीपर गीत व झेंडा गीत गाऊन आणखीनच शोभा आणली.त्याचप्रमाणे देश प्रेमावर व एकतेचे नारे विद्यार्थ्यांनी दिले. या ध्वजारोहण प्रसंगी वेळी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, तात्या मुळीक, मधुकर जाधव, स्नेहल मुळीक, महेश शिरसाट, कविता शेगडे, सानिका शेवडे,ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, माजी पंचायत समिती सदस्य लाडोबा केरकर,गुरुप्रसाद नाईक, निवृत्तपोलीस अधिकारी बापू नाईक,दिलीप शिरसाट, सुरेश नाईक,आशाताई,अंगणवाडी सेविका, सीआरपी, शिक्षक,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.