You are currently viewing 108 रुग्णवाहिका चालकांचा कणकवलीत होणार गौरव; नगराध्यक्ष समीर नलावडे….

108 रुग्णवाहिका चालकांचा कणकवलीत होणार गौरव; नगराध्यक्ष समीर नलावडे….

कणकवली

कोरोना संसर्ग काळातही 108 रुग्णवाहिका सेवा देणारे कोरोना योद्धा तथा रुग्णवाहिका चालकांचा कणकवलीत15 ऑक्टोबरला सत्कार होणार आहे. कणकवली नगरपंचायतमध्ये जिल्ह्यातील 28 चालकांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष यांनी दिली आहे. श्री नलावडे म्हणाले गर्भवती महिलांची ने-आण तसेच कुठेही अपघात झाल्यानंतर क्षणात पोचणाऱ्या 108 रुग्णवाहिकेवरील चालकांनी, कोरोना संसर्ग काळातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आघाडी सरकारने 108 रुग्णवाहिका सुरू केली. मात्र त्यावरील चालक अजूनही कायमस्वरूपी सेवेत रुजू झालेले नाहीत. गेले चार-पाच महिने या चालकांना मानधनही मिळत नाही. अशा बिकट परिस्थितीमधे कोरोना योद्धा असलेले हे चालक अविरत सेवा देत आहेत. या कोरोना योद्ध्यांची दखल कणकवली नगरपंचायत ने घेतली आहे. जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिकेच्या सर्व चालकांना 15 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता नगरपंचायत सभागृहं येथे गौरविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा