You are currently viewing 75 फुटी ध्वजस्तंभ उभारून कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी शासकीय सेवेत निर्माण केला आदर्श

75 फुटी ध्वजस्तंभ उभारून कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी शासकीय सेवेत निर्माण केला आदर्श

आमदार नितेश राणे यांनी केले तहसीलदार पवार यांचे कौतुक

कणकवली

75 फुटी ध्वजस्तंभ उभारून कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी शासकीय सेवेतील आदर्श जनतेसमोर मांडलेला आहे. लोकसहभागातून काम करताना अधिकाऱ्यांनी कसे वागले पाहिजे,कसे काम केले पाहिजे याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. कणकवली तहसीलदार यांनी उभारलेला हा ध्वजस्तंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला ध्वजस्तंभ आहे. आजपर्यंत अशी कामगिरी जिल्ह्यात कोठेही झालेले नाही आणि ती कणकवली तालुक्यात होते.माझ्या शहरात होते.याबद्दल मला अभिमान आहे. मी कणकवली तहसीलदारांच्या या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. अशा शब्दात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी तहसीलदार आर.जे. पवार यांचा गौरव केला.
कणकवलीत काढलेली तिरंगा रॅली तहसीलदार कार्यालयाकडे आली असता, नव्याने उभारलेल्या ध्वजस्तंभाकडे समोर थांबून आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येक अधिकारी,कर्मचारी आणि जनता सहभाग घेत आहे. मात्र कणकवली तालुक्यात कणकवली तहसीलदार पवार यांनी कणकवलीतील जनतेच्या सहभागातून 75 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्याचा संकल्प केला. आणि तो ध्वजस्तंभ आज उभारून पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा