You are currently viewing शीर्षक – तिरंगा

शीर्षक – तिरंगा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ.मृदुला कुलकर्णी (खैरनार) लिखित अप्रतिम काव्यरचना

 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • *शीर्षक – तिरंगा*

 

एकात्मतेचा वसा तिरंगा !

समृद्धतेचा ठसा तिरंगा !

 

सामर्थ्य दिसते इथे जगाला

उत्तुंग जातो जसा तिरंगा

 

देशांतराला निघून गेले

विसरेल कोणी कसा तिरंगा ?

 

रविचंद्र असती नभांगणी ते

विश्वात राहो तसा तिरंगा !

 

वंदन करूया चला ध्वजाला

फडकेल न्यारा असा तिरंगा !

 

डॉ.मृदुला कुलकर्णी (खैरनार)©

पुणे. 15/08/22

 

💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐

प्रतिक्रिया व्यक्त करा