मालवण :
गुरामवाडी ग्रामपंचायत, कट्टा येथे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या चतुर्थ वर्षांतील विद्यार्थिनी 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट रोजी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी प्रदर्शन भरविण्यात आले होते.
यात अनुजा तायशेटे, लीना धुरी, कविता मोरे, प्रियांका राऊत, सन्नवी सांगळे,अर्चना सी. बी. , पंचमी नायर यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनामध्ये विविध कृषी विषयक माॅडेल, औषधी वनस्पती, फुल झाडे, फळ झाडे, कीटकनाशके, अवजारे, जापनीज आर्ट कोकेडामा, टेरेरीअम प्रदर्शित केले होते.
याप्रदर्शनाला तालुका कृषी अधिकारी, मालवण. श्री.व्ही. जी.गोसावी सर, कृषी पर्यवेक्षक, मालवण श्री.डी.डी.गावडे सर, केवीके शास्त्रज्ञ किर्लोस श्री.विलास सावंत सर, आत्मा समन्वयक श्री.एन.एम.गोसावी सर, कृषी सहाय्यक श्री.पी.के.सौंगडे सर,धामापुर कृषी सहाय्यक श्रीम.एस.व्ही.चौखंडे मॅडम यांनी भेट दिली. कृषी प्रदर्शनाला ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.