You are currently viewing पवित्र अमुचा देश

पवित्र अमुचा देश

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम देशभक्तीपर गीत*

*पवित्र अमुचा देश*

पवित्र अन् मंगल अमुचा देश हा हिंदुस्थान
करूया सेवा देशाची अमुचा तो अभिमान।। धृ।।

हिंदू मुस्लिम शिख इसाई ना इथे कुठला पंथ
गीता कुराण बायबल हे पवित्र इथले ग्रंथ
बंधुभाव अन् समानतेने नांदू आपण छान
करूया सेवा देशाची अमुचा तो अभिमान।। १।।

पावन झाली भूमी शूर वीरांच्या रक्ताने
गाऊ त्यांची वीरगाथा सारे अभिमानाने
भारतभूचे जवान आम्ही देऊ देशासाठी प्राण
करूया सेवा देशाची अमुचा तो अभिमान।। २।।

*🖊©सौ आदिती मसुरकर*
* *कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा