शिरोडा
आज दि.13 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत हॉल शिरोडा येथे संध्याकाळी 3.30 वाजता महिला मेळावा निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उपस्थित महिलांना आरोग्य विषयी माहिती देण्यात आली तसेच योग प्रशिक्षक डॉ. शीतल माने यांच्या योग प्रशिक्षणातुन शारीरिक प्रतिकार शक्ती वाढविणे , मानसिक संतुलन राखणे , एकाग्रता वाढविणे तसेच तणावमुक्त जीवन जगणे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
महिला मेळाव्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला , यावेळी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावातील सर्व सामान्य ग्रामस्थांच्या निरोगी व सशक्त आरोग्यासाठी ग्रामपंचायत मार्फत असेच उपक्रम राबवून पूर्ण गाव निरोगी सशक्त ठेवावे. असे विचार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमा साठी सरपंच श्री.मनोज उगवेकर व ग्रामविकास अधिकारी सुनील चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या तसेच हर घर तिरंगा उपक्रम उत्साहात यशस्वी करण्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी श्रीम.शिरसाट सि.एच.ओ. , श्रीम. साळगांवकर आ.सहायिका , श्रीम.रेडकर आ सेविका ,श्री.आजगांवकर आ.सेवक , तसेच आशा व अंगणवाडी सेविका तसेच गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.