You are currently viewing दादा सारंग यांचा युवा सेना उपतालुकाप्रमुख पदाचा राजीनामा

दादा सारंग यांचा युवा सेना उपतालुकाप्रमुख पदाचा राजीनामा

शिवसेना युवा सेना उपतालुका प्रमुख सखाराम उर्फ दादा सारंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
तालुका प्रमुख पंकज शिरसाट यांच्याकडे दादा सारंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला. दादा सारंग याच्या राजीनाम्यामुळे युवा सेनेत वेंगुर्ला तालुक्यात भविष्यात मोठे खिडार पडण्याची शक्यता आहे. त्यांचा सामाजिक कार्यात आणि क्रिडा क्षेत्रात आवर्जून उल्लेख केला जातो. साई स्पोर्ट नावाने क्रिकेट संघ प्रसिद्ध आहे. ते माजी तटामुक्ती सदस्य म्हणून दाभोली गावात कार्यरत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा