You are currently viewing बोरीवली च्या सेंट रॉक डिग्री कॉलेज ऑफ लॉ ने दिला लागोपाठ 3 वर्षे 100 टक्के निकाल!

बोरीवली च्या सेंट रॉक डिग्री कॉलेज ऑफ लॉ ने दिला लागोपाठ 3 वर्षे 100 टक्के निकाल!

प्रिन्सिपल श्वेताली पाटील ह्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबई प्रतिनिधी – बोरीवलीच्या सेंट रॉक डिग्री कॉलेज ऑफ लॉ ने लागोपाठ 3 वर्षे 100 टक्के निकाल देऊन मुंबई मध्ये प्रधीतयश महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवलेले आहे.

आज 3 वर्षे एल. एल. बी. चा मुंबई युनिव्हर्सिटी चा निकाल लागला. सेंट रॉक महाविद्यालयातून धनंजय जुन्नरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून दर्शना पाटणकर आणि निलेश अरोरा त्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. श्री हरी एज्युकेशन ट्रस्टचे सेंट रॉक विधी महाविद्यालय प्रिंसीपल श्वेताली पाटील त्यांनी अथक प्रयत्नांनी नावारूपास आणलेले आहे. महाविद्यालयात नविन् नविन उपक्रम राबविणे . कोर्ट, मध्यवर्ती कारागृहांना भेटी, पोलीस ठाण्यांना भेटी, शैक्षीण भेटी देऊन मुट कोर्ट चे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम केलेले आहे. महाविदयालयाचा लागोपाठ 100 टक्के निकाल लागण्यासाठी
प्रो. अर्पिता शिर्के , प्रो करीष्मा पांडे , प्रो मनिषा पाठक , प्रो. प्रफुल साळवी, प्रो. नितीन साळवी ह्यांनी खूप कष्ट घेतले. परिसरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे सर्व थरातून स्वागत होत आहे.

प्रिंसीपल श्वेताली पाटील यांच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला गेला आहे.

डावीकडून अडव्होकेट नितीन साळवे, अडव्होकेट मनीषा पाठक ,प्रिन्सिपल श्वेताली पाटील , अडव्होकेट करिष्मा पांडे, अडव्होकेटअर्पिता शिर्के, अडव्होकेट प्रफुल साळवे

प्रतिक्रिया व्यक्त करा