You are currently viewing दारी उमलली ११ब्रम्हकमळे!

दारी उमलली ११ब्रम्हकमळे!

कासार्डेतील विजयानंद गायकवाड यांच्या बागेत कमळाविष्कार

कासार्डे

काही वनस्पतींची फुले आपल्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीमुळे माणसांना भुरळ घालतात त्यांपैकी एक म्हणजे ब्रम्हकमळ होय. कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नजीक राहत असलेले प्राथमिक शिक्षक विजयानंद गायकवाड यांच्याबागेत ११ दुर्मिळ ब्रम्हकमळ फुलली आहेत.


कमळ जातीतील एक जात म्हणजे ब्रम्हकमळ होय.
“नाईट क्विन” म्हणुनही हे फुल परिचित आहे.या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त रात्रीच्यावेळीच उमलते.विशेष म्हणजे रात्री १२वा पुर्णपणे उमलते व पहाटे पासुन सकाळपर्यंत कोमेजून गळून पडते.थोडक्यात हे फुल उमलण्याचा प्रवास, आणि त्याचे पुर्ण उमलेले रुपडे पाहायचं असेल तर जागरण करायला हवे.
हिंदु धर्मात, हिंदु संस्कृतीत हे फुल फार पवित्र मानले जाते. या फुलाचे सूक्ष्म निरीक्षण केले असता, यावर ब्रह्मदेव व त्रिसुळाच्या आकृतीचा भास होतो. म्हणून ह्याला ब्रह्मकमळ या नावाने ओळखले जाते. शिवशंकराला हे फुल अतिशय प्रिय आहे असेही अख्यायिका आहे. या वनस्पतीला साधारणपणे तीन ते पाच वर्षातून एखाद्या वेळेस फूल येते. याला मंद, गोडसर वास असतो आणि विशेष म्हणजे रात्री वेळेस फुलते.
विजयानंद गायकवाडांच्या बागेत एकाचवेळी फुलली ही दुर्मिळ ११ ब्रह्मकमळे सध्या कासार्डे परिसरात कुतूहलाचा विषय बनली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा