जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी लिखित अप्रतिम काव्यरचना
पंच्याहत्तर वर्षाच्या देश स्वातंत्र्यात
सांगा आम्हाला काय मिळालं
अवती भवतीचीअवस्था पाहून
आमच्या तोंडचं पाणी पळालं
तिरंगा आमचा आहे महान
त्याच्या वरी आमचा जीव
घर नसतांना लावावा कोठे
आमची आम्हाला येते किव
पुढारी बदलतात वेळोवेळी पक्ष
आम्ही नुसते पाहत बसतो
श्रीमंत असतात नेहमी तुपाशी
आम्हाला कधीकधी घासही नसतो
साहेब मेट्रो प्रकल्प घेतला हाती
अभिनंदन तुमचे करावे किती
आमच्या गावात रोज जातांना
तुडवितो आम्ही चिखल माती
आता सगळं झालं वेगवान
देशात म्हणे आले तंत्रज्ञान
भाकरी काही डाऊनलोड होईना
जिवाचे केले कितीही रान
सगळी संपत्ती एकवटली
मुठभर श्रीमंतांच्या हाती..
गरिबीचा सात बारा मात्र
आहे फक्त आमच्या साठी
पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त
आपण सर्व जण झालो
भारत झाला नवा इंडिया
आम्ही अन्नावाचून कि हो मेलो.
*सुजाता नवनाथ पुरी*
अहमदनगर.
8421426337