You are currently viewing अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या युवा पिढीला वाचविण्यासाठी वेंगुर्लावासीयांचा निर्धार 

अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या युवा पिढीला वाचविण्यासाठी वेंगुर्लावासीयांचा निर्धार 

वेंगुर्ला :

 

अंमली पदार्थ विरोधी व जनजागृती समिती, वेंगुर्ला या अराजकीय संस्थेची तातडीची सभा दिनांक 14  रोजी सकाळी 10 वाजता स्वामिनी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत मागील 3 महिन्यात केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून पुढील 6 महिन्याची किमान समान कार्यक्रमाची रूपरेषा तसेच कालबद्ध आराखडा तयार करण्यात येणार आहे.

यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योग, सांस्कृतिक, साहित्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांना सोबत घेऊन वेंगुर्ला शहराची तसेच 30 ही ग्रामपंचायत मध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात सक्षमपणे कार्य करण्यासाठी शासन व नागरिकांची एकत्रित “दक्षता व अंकुश समिती” स्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती, सिंधुदुर्ग या शासकीय समितीची वेंगुर्ला शहरात विशेष सभा आयोजित करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांची लवकरच भेट घेऊन लेखी निवेदन देण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे.

NCB, मुंबई/गृह मंत्रालय, महाराष्ट्र शासन/गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेकडे तालुका समिती मार्फत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पेडलरांची यादी देण्यात येणार आहे.

तरी वेंगुर्ला शहरातील व संपूर्ण तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्ते व सुजाण नागरिकांनी सदर सभेस उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन डॉ. संजीव लिंगवत, श्री. सत्यवान साटेलकर व श्री. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा