देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्गनगरी,
देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरु असल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणाच्या व्दारे परीचलनाच्या कार्यक्रमानुसार सध्यस्थितीत दि. 1 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये धरणामध्ये तलांक 184.00 मी.पातळीपर्यंत पाणीसाठा करावयचा आहे.
सध्यास्थितीत धरणाची पाणीपतळी 185.00 मी. इतकी झाली असून ती विहित मर्यादेपेंक्षा जास्त झाल्याने व पाऊस सुरु असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे आवश्यकतेनुसार उघडावे लागणार आहेत. यासाठी दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 4 वा. धरणाचे दरवाजे अंदाजे 5 ते 10 सेमी ने उघडण्यात येत आहेत. त्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढण्याची शक्यता आहे.
तरी नदी काठच्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना इशारा देण्यात येतो की, जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरु नये व सावधानता बाळगावी,याची नोंद घ्यावी. असे आवाहन आंबडपाल-कुडाळचे मध्यम प्रकल्प विभागीय पथक, कार्यकारी अभियंता हर्षद यादव यांनी केले आहे.