स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काँग्रेस पक्षा मार्फत संपूर्ण देशात आजादी गौरव पदयात्रा क्रांतीदिनी म्हणजेच 9 ऑगस्ट पासून 14 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक तालुक्यात काढली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पदयात्रेची सुरवात महात्मा गांधीनी केलेल्या मिठाचा सत्याग्रहाचे ऐतिहासिक ठिकाण वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथून पदयात्रेची सुरवात करण्यात आली होती. मिठाचा सत्याग्रह झालेले दुसरे ऐतिहासिक ठिकाण मिठबाव या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत तिरंगा डौलाने फडकत होता त्याच बरोबर याद करो कुर्बानी असे लिहिलेल्या फलकावरील महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरु,सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,भगतसिंग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लालबहादूर शास्त्री अश्या अनेक स्वातंत्र्य सेनानीच्या फोटोमुळे स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणीना उजाळा मिळाला. यावेळी रिक्षा मधून लावलेल्या देशभक्तीपर गीतानी वातारण उल्हसित झाले होते. ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ या घोषणानी परीसर देशभक्तीमय झाला. या पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख,सिंधुदुर्ग युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर,जिल्हा काँग्रेस सचिव आनंद परूळेकर,देवगड कॉंग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर,चंदन पांगे,उमेश कुळकर्णी,माजी पंचायत समिती सदस्य अरविंद भोगले, आचरा माजी सरपंच चंदन पांगे,किंजवडे उपसरपंच दत्ताराम कदम,अशोक घाडी,किंजवडे सोसायटी संचालक दीपक पाडावे,जिल्हा सदस्य खालिद बगदादी,जयदीप घाडी,विशाल पाडावे,प्रकाश पाडावे,तुषार घाडी,प्रशांत घाडी,किरण हळदणकर,रुपेश राणे,आदित्य आचरेकर,आदी उपस्थित होते
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त मिठबाव येथे काँग्रेसच्या वतीने पदयात्रा
- Post published:ऑगस्ट 13, 2022
- Post category:बातम्या / वेंगुर्ले
- Post comments:0 Comments