You are currently viewing रानबांबुळीत उन्नती महिला मंडळच्या वतीने स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रानबांबुळीत उन्नती महिला मंडळच्या वतीने स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथे उन्नती महिला मंडळ, रानबांबुळीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचे निमित्त साधून विविध कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमात दहावी बारावी मुलांचा भेटवस्तू देऊन सत्कार, पाचवी ते सातवी रानबांबुळी शाळा नंबर एक मुलांचा निबंध स्पर्धेत (स्वराज्याची यशोगाथा) चार नंबर काढण्यात आले, तसेच समीर चंद्रकांत ठाकूर यांनी “बारावी नंतर काय?” या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी रानबांबुळी सरपंच वसंत बांबुळकर, उपसरपंच सतीश परब, संजय लाड, मुख्याध्यापक पाथर्डी सर, नाईक सर, खोत सर, मसुरकर मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा