कालावल किनारी भर पावसातही महिलांचा उत्साही प्रतिसाद..
मालवण (मसुरे) :
मसुरे खोत जुवा येथील बंड्या खोत मित्र मंडळाच्या वतीने कालावल नदी किनारी आयोजित खास महिलांसाठी नारळ लढविणे या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ शैलजा उत्तम खांबल, द्वितीय क्रमांक सौ सुचित्रा ज खांबल आणि तृतीय क्रमांक सौ शैलजा शंकर खोत यांनी पटकावला. या १ ते ३ क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे भरजरी पैठणी,सोन्याची नथ,सेमी पैठणी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
मसुरे खोत जुवा येथील बंड्या खोत मित्र मंडळाच्या वतीने कालावल नदीकिनारी आयोजित या जिल्हास्तरीय भरविण्यात आलेल्या खास महिलांच्या नारळ लढविण्याच्या स्पर्धेला दीडशे महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. भर पावसातही या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आबा खोत किसन मांजरेकर दिनेश साळकर सौ रंजना रेडकर, मसुरे माजी ग्राप सदस्य अनिल खोत, बंड्या खोत, महेंद्र खोत, साईप्रसाद खोत, प्रणय खोत, रणजीत खोत, संतोष पाटील, प्रवीण खोत, अंतरा खोत, शैलजा खोत, चिंतामणी खोत, पप्पू कांदळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बंड्या खोत मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली होती.
ग्रामीण भागात अशा प्रकारची ही स्पर्धा भरवून जिल्ह्यातील महिलांना एक प्रकारचे व्यासपीठ मिळवून दिल्याचे समाधान आज आमच्या या मित्रमंडळाला होत आहे. भर पावसातही ही स्पर्धा कोणत्याही महिला भगिनीला त्रास न होता यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करताना भविष्यात अशाच पद्धतीने सर्व समावेशक विविध उपक्रम हाती घेऊन समाजाभिमुख काम करण्याचा मानस सामाजिक कार्यकर्ते बंड्या खोत यांनी बक्षीस वितरण प्रसंगी व्यक्त केला. यावेळी या स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.