तक्रार अर्ज दिल्यावर, नायब तहसीलदार यांच्या सूचना
सावंतवाडी – न्हावेली येथील रास्त धान्य दुकानातून ग्राहकांना वेळेवर धान्य द्या अन्यथा कारवाई करावी लागेल असे नायब तहसीलदार मुसळे यांनी सोसायटी चेअरमन धाऊसकर यांना सूचना केली आहे.
न्हावेली येथील रास्त धान्य दुकान हे नियमित चालू नसते. तसेच योग्यवेळी धान्य पुरवठा केला जात नाही. त्याच प्रमाणे त्या ठिकाणचे कर्मचारी हे ग्राहकांची उर्मटपणे वागतात अशी लेखी तक्रार निवेदनाद्वारे न्हावेली ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली होती. त्यालाच अनुसरून संबंधित व्यवस्थापन करणारी सोसायटी व तक्रारदार ग्रामस्थ यांची एकत्रित सुनावणी आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात ठेवण्यात आली होती.यावेळी न्हावेली ग्रामस्थांनी नायब तहसीलदार मुसळे यांच्यासमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला.यावेळी न्हावेली सोसायटीचे चेअरमन भरत धाऊसकर,व्हॉइस चेअरमन आनंद नाईक उपस्थित होते. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात सोसायटी चेअरमन धाऊस्कर यांना नायब तहसीलदार मुसळे यांनी तात्काळ रास्त धान्य दुकानातून ग्राहकांना वेळेत धान्यपुरवठा करा अन्यथा तुमचापरवाना रद्द केला जाईल अशा सक्त सूचना दिल्या.यावेळी तक्रारदार ग्रामस्थ यांना यापुढे कोणताही नाहक त्रास झाल्यास व्यवस्थापन करणाऱ्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार मुसळे यांनी ग्रामस्थांना दिले.यावेळी सोसायटीचे चेअरमन यांना व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी आणखीन एक महिन्याचा कालावधी देण्यात आला.व्यवस्थापनात योग्य ती सुधारणा करू असे प्रतिज्ञापत्र हि सोसायटीने सादर करण्याचा आदेश नायब तहसीलदार मुसळे यांनी सोसायटी चेअरमन यांना दिला. या एका महिन्याच्या कालावधीत व्यवस्थापनात योग्य सुधारणा न झाल्यास कायमस्वरूपी व्यवस्थापन चा परवाना रद्द करून त्या ठिकाणी दुसर्याची नेमणूक करण्यात येईल अशीही सूचना नायब तहसीलदार मुसळे यांनी सोसायटी चेअरमन भरत धाऊसकर याना केल्या.यावेळी सरपंच प्रतिभा गावडे,प्रथमेश नाईक,तुळशीदास पार्सेकर, रुपेश नाईक, भीमा नाईक, बाळा नाईक,महादेव चौकेकर,रितेश पार्सेकर,विलास मेस्त्री, समीर पार्सेकर,सुदन पार्सेकर,सारिका दळवी, श्वेता दळवी, शैलेश भगत, सगुण नाईक, गितेश परब, भिमा परब,दिगंबर परब,सुनील धाऊसकर, अमित चौकेकर, अंकित चौकेकर, हेमचंद्र सावळ,संजय दळवी, वैभव चौकेकर, तात्या चौकेकर,अनंत परब, रोहिदास सावळ, अक्षय पार्सेकर, राजन कालवणकर, प्रणाली दळवी, पार्वती धवन, प्रवीण गावडे, मनीषा दळवी आदी उपस्थित होते.