You are currently viewing 13 ऑगस्टला कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांचे जिल्ह्यात जंगी स्वागत

13 ऑगस्टला कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांचे जिल्ह्यात जंगी स्वागत

सावंतवाडी :

 

राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. 13 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता सावंतवाडी येथील वैश्य भवन येथे वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार सोहळा करण्यात येणार आहे. अशी माहिती वेंगुर्ला शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली. राज्याचे कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्हा दौऱ्याची जय्यत तयारी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. या नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली.

यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, उप तालुकाप्रमुख सुरेश मुंडये, कौशिक परब, देवा कांबळी, महीला तालुकाप्रमुख सुचिता वजराटकर, शहर प्रमुख सचिन वालावलकर, उपशहर प्रमुख उमेश येरम, डॉ. रावजी परब, माजी नगराध्यक्ष वेंगुर्ला संदेश निकम, माजी जि. प. सदस्य तथा प्रमुख जिल्हा कार्यकारणी सदस्य सिंधुदुर्ग शिवसेना नितीन शिरोडकर, मीडिया सेल प्रमुख साईप्रसाद केरकर, शिवसेना प्रवक्ते महेश सामंत, महिला तालुकाप्रमुख संघटक प्रतीक्षा पाटकर, विभाग प्रमुख योगेश तेली, रवींद्र केळुस्कर, यशवंत मठकर, उप विभागप्रमुख रविंद्र कासवकर, कृष्णा तुळसकर, गजानन बांदिवडेकर, प्रमुख कार्यकारिणी सदस्य दयानंद सावंत, अरविंद नाईक, दत्तगुरू परब, दत्तात्रय वजराटकर, राजन गावडे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा