नळयोजनेवरही परिणाम
4 दिवसांत सुरळीत न केल्यास तिव्र आंदोलन ; पंढरी वायंगणकर यांचा इशारा
नांदगाव
नांदगाव विभागात गेले काही दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असून या सतत होणाऱ्या विज पुरवठा खंडित मुळे या परीसरातील नळ पाणी योजनेवर विपरीत परिणाम होत आहे काही भागात तर ३ ते ४ दिवस नळ पाणी पुरवठा होवू शकले नाही.
यावर तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या ४ दिवसांत तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा कणकवली भारतीय जनता पार्टी चे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे.
मागील महिन्यातच याबाबत कणकवली येथे विजवितरण कंपनी ला भाजप शिष्टमंडळाने भेट देत याबाबत चर्चा केली होती. मात्र या समस्यांवर कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने वारंवार विजपुरवठा खंडीत होत आहे. मेन लाईन मध्ये बिघाडामुळे विज पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जाते. मात्र हे आता नेहमीचेच झाले आहे. आता गणेश चतुर्थी सण जवळ येत आहे.गणपती शाळेत तर दिवस रात्र काम सुरू आहे अशा वेळी वारंवार होणाऱ्या विज पुरवठा खंडित मुळे व्यत्यय येत आहे. सध्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने ठीक ठिकाणी कार्यक्रम होत आहे. यात विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.तरी येत्या ४ दिवसांत विज पुरवठा सुरळीत न केल्यास तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा कणकवली भारतीय जनता पार्टी चे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे.