You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या वतीने झाडांना व सेवा देणाऱ्या कर्मचारी व व्यावसायिकांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन

बांदा केंद्र शाळेच्या वतीने झाडांना व सेवा देणाऱ्या कर्मचारी व व्यावसायिकांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन

बांदा

जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १शाळेतील स्काऊट गाईड पथकामार्फत शाळेच्या परिसरातील झाडांना व अहोरात्र सेवा बजावत असलेल्या विविध कर्मचारी व व्यावसायिक यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला.
रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या पवित्र व अतूट नात्याचा सण म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.बांदा केंद्र शाळेचे विद्यार्थी या सणाच्या निमित्ताने स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत दरवर्षी स्वनिर्मित राख्या बनवून देशसेवा करत असलेल्या सीमेवरील सैनिकांना पाठवितात.यावर्षी विद्यार्थ्यांनी पोस्टाने सैनिकांना राख्या पाठविल्या आहेत.


रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बांदा केंद्रशाळेतील स्काऊट गाईड पथकामार्फत शाळेच्या परिसरातील झाडांना राखी बांधून पर्यावरणाचा अनोखा संदेश‌ दिला.या दिवशी विद्यार्थ्यांनी अहोरात्र सेवा देणारे पोलिस कर्मचारी,रिक्षा व्यावसायिक, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी, परराज्यातून बांद्यात कामानिमित्त स्थायिक झालेले कामगार व बांदयातील नागरिकांना राख्या बांधून औक्षण केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना हाँटेल व्यावसायिक रविंद्र सावंत पटेकर यांनी अल्पोपहार दिला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे स्काऊटर शिक्षक जे.डी.पाटील, पदवीधर शिक्षका उर्मिला मोर्ये, जेष्ठ शिक्षिका सरोज नाईक,उपशिक्षक गोपाळ साबळे यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा