You are currently viewing कुडाळात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे जिल्हा बँक अध्यक्षांनी केले स्वागत

कुडाळात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे जिल्हा बँक अध्यक्षांनी केले स्वागत

कुडाळ :

 

कोकण दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी कुडाळ येथे स्वागत केले. भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत संघटनात्मक बैठकांसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्वागत केले. पुष्पगुच्छ देऊन मंत्रीमहोदयांचे स्वागत केले. यावेळी आम. नितेश राणे, माजी. आम. प्रमोद जठार व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा