You are currently viewing भारतीय ध्वज संहिता२००६

भारतीय ध्वज संहिता२००६

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे लिखित लेख*

*भारतीय ध्वज संहिता२००६*
भाग तीन
** कलम २**

सरकारी रित्या ध्वज लावणे
ध्वज संहिता अनुपालन करून संघटना/ अभिकरणाना ध्वज लावणे अनिवार्य आहे
** कलम ३**
ध्वज लावण्याची योग्य पध्दत ध्वज प्रतिष्ठा राखून. शासकीय नियमांच्या अधीन राहून लावण्यात यावा. सरकारी इमारती शासकीय निमशासकीय कार्यालये यावर ध्वज लावणे प्रथा आहे. रविवार सुट्टीचा दिवस धरून दर दिवशी ध्वज लावण्यात येईल.अशी ध्वज संहिता मध्ये तरतूद आहे. सुर्योदयापासून सुर्यास्तापरयणत ध्वज लावण्यात येईल. ध्वज चढविताना झर्रकन चढवावा आणि उतरताना सावकाश उतरणयात यावा. मोटार वाहन वर ध्वज वापरताना तो वाहनांच्या मध्यभागी मजबूत लावण्यात यावा. मिरवणूक अथवा संचलन मध्ये ध्वज मध्यभागी पुढे असावा.
** कलम ४**
ध्वज लावण्याची चुकीची पद्धत फाटलेला. मळलेला.चुरगळलेला . ध्वज लावला जाऊ नये. कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली घेऊ नये. दुसरा ध्वज आपल्या राष्ट्रध्वज पेक्षा उंचावर लावू नये. ज्या काठीवर ध्वज फडकत असेल किंवा त्या काठिवर हार फुले बोधचिन्ह. अशी कोणतीही वस्तू ठेवू नये.धवजाचा तोरणं.पताका म्हणून उपयोग करता येणार नाही. ध्वजाचा केशरी पट्टा खाली येईल असा ध्वज लावू नये. ध्वज फाटेल अशा पध्दतीने लावू नये.
** कलम ५**
गैरवापर ध्वजाचा आचछदन म्हणून वापर करु नये. ध्वजाचा मोटर वाहन. रेल्वेगाडी.जहाज . यांच्या झडपावर छतावर बाजूंवर किंवा पाठिमागे आचछदन म्हणून वापरता येणार नाही. ध्वजावर कोणतीही अक्षरें लिहू नये.
** कलम ६**
सलामी ध्वजारोहण करण्याच्या अथवा ध्वजावतरणाचया प्रसंगी अथवा एखाद्या संचालनातून ध्वज नेण्यात येत असताना अथवा पाहणी करत असताना उपस्थित सर्व व्यक्तिंनी धवजाकडे पाहून सावधान स्थितीत उभे राहावे.
** कलम ७**
इतर राष्ट्रे व संयुक्त राष्ट्र संघ यांच्या धवजासमवेत राष्ट्रध्वज लावणे.आपला राष्ट्रध्वज इतर देशांच्या धवजाबरोबर सरळ रांगेत उभा करायचा असेल तेव्हा तो उजवीकडील बाजूंस उभारावा. म्हणजे सर्वात प्रथम आपला राष्ट्रध्वज असावा.
** कलम ८**
सरकारी इमारती वर / शासकीय निवासस्थानावर ध्वज लावणे उच्च न्यायालयाये/ सचिवालये/आयुक्तांची कार्यालये/ जिल्हाधिकारी कार्यालय/ तुरुंग/ जिल्हा मंडळ/ सीमा प्रदेश/ जकात नाका/चौक्या/ राष्ट्रपती/ उप राष्ट्रपती/ राज्यपाल/ सरकारी निवासस्थान/ मुख्यालय/ तथापि सरकारी उच्चपदस्थ व्यक्ति / प्रजासत्ताक दिनी/ स्वातंत्र्य दिन/ महात्मा गांधी जयंती/ राष्ट्रिय सप्ताह/ ( ६ते १३ एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड/ हुतात्मा स्मृती सप्ताह/ राष्ट्रपती पंतप्रधान जेव्हा एखाद्या संस्थेला भेट देतील तेव्हा त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ध्वज लावता येईल.
** कलम ९**
मोटार गाड्यांवर ध्वज लावणे
राष्ट्रपती/ उप राष्ट्रपती/राज्यपाल व उपराज्यपाल/पर राष्ट्रातील भारताचे अधिस्वीकृती प्रतिनिधी मंडळाचे/ चौकीचे प्रमुख/ पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री/केंद्रीय राज्यमंत्री/ इतर उपमंत्री/ लोकसभा अध्यक्ष/राज्यसभेचे उप सभापती/ लोकसभेचे उपाध्यक्ष/ विधानपरिषद सभापती/ राज्य आणि राजयसंघ/विधानसभा उपाध्यक्ष/ भारताचे मुख्य न्यायमूर्ती/ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश/ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती/उच्च न्यायालयाचे न्यायाधीश/
** कलम १० **
रेल्वे व विमानावर ध्वज लावणे राष्ट्रपती जेव्हा रेल्वे प्रवास करित असतील तेव्हा. राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान रेल्वेने दौ-यावर जाणार असतील तेव्हा. असे उच्चपदस्थ व्यक्ति ज्या बाजूने उतरणार असतील त्या बाजूलाच विमान रेल्वे मध्ये ध्वज लावणे बंधनकारक आहे.
** कलम ११ **
ध्वज अर्ध्यावर उतरवणे खालील उच्चपदस्थ व्यक्तिच्या मृत्यू प्रसंगी किंवा निधनाच्या दिवशी ध्वज अर्ध्यावर उतरविता येईल
उच्चपदस्थ व्यक्ति राष्ट्रपती/ उपराष्ट्रपती/ पंतप्रधान/ भारतात सर्वत्र
लोकसभा अध्यक्ष / भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती/ केंद्रीय राज्यमंत्री// केंद्रीय कॅबिनेट मंत्री/ केंद्रीय राज्यमंत्री मंत्री/ केंद्रीय उपराज्यमंत्री/ दिल्ली आणि राज्याच्या राजधान्या/ दिल्ली
राज्यपाल/ उपराज्यपाल/राज्याचे मुख्यमंत्री/ संघराज्य क्षेत्रांचे मुख्यमंत्री/ दुखवटा पाळण्यासाठी ध्वज अर्ध्यावर उतरविला जाईल / सरकार सेनादल/ केंद्रिय निमलष्करी दल/ यांच्या मार्फत काढण्यात येणारया शवयात्रा अंत्ययात्रा या प्रसंगी ध्वज ताटिवर अगर शवपेटी वर आचछदला पाहिजे.असे करताना केशरी रंग हा शवपेटी अगर ताटीचया डोक्याकडे आला पाहिजे. ध्वज मृत व्यक्तिसोबत दहन अथवा दफन करू नये.याशिवाय देशातील विदेशी मंडळाचा राष्ट्रध्वज सुध्दा अर्ध्यावर उतरविणे आवश्यक असल्याशिवाय त्या मंडळाकडून राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही.
राष्ट्रध्वज १५ आॅगसट दिवशी आपणं आपली व आपल्या देशांची प्रतिष्ठा संस्कृती यासाठी मानवंदना देऊन आपणं साजरा करतो आणि दुसरया दिवशी तोच ध्वज कचरयात रस्त्यावर पडलेला आपणांस दिसतो एकच दिवस नाही तर कायमच आपणं या ध्वजाचा मान ठेवला पाहिजे . आपल्याला स्वातंत्र्य रक्त सांडून मिळाले आहे रक्त सांडणारे यांचे बलिदान विसरू नका
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा