*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन-रायबागकर लिखित अखंडित काव्य रचना*
*हिंमत*
मोत्यावानी पडती धारा
धारा जशा मुसळ भासे
भासे घणाण् घण घाव
घाव कणसांवर बसे
बसे मार, आडवं पीक
पीक झोपलं शिवारात
शिवारात पांढरा खच
खच गारांचाच रानात
रानात हिरवं सपान
सपान मोडलं दैवानं
दैवानं साधला डावच
डावच कर्जाच्या ओझ्यानं
ओझ्यानं वाकलो जरीही
जरीही पेकाट मोडलं
मोडलं, करीन सरळ
सरळ कितीही झोडलं
झोडलं तरीही उभाच
उभाच पुन्हा राबण्यास
राबण्यास हिंमत दे गा
दे गा यश भरवशास
भरवसा तुझाच आता
आता सुबुद्धी दे सकला
सकला कळु दे केव्हाही
केव्हाही *धान्यच* खायला
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334