मालवणात आज ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव
पर्यटन व्यावसायिक महासंघाचे व्यावसायिकांना रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
मालवण
आपल्या हिंदू संस्कृतीत नारळी पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे याच कारण म्हणजे ज्या दिवशी श्रीफळ सागराला अर्पण करतो त्या दिवसापासून प्रत्येकाच्या व्यवसायाला खरा शुभारंभ होतो, आणि याच भावनेतून पर्यटन व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक, व्यापारी बंधू, ऑटो रिक्षा संघटना आणि सर्व नागरिक यांच्या सहभागातून प्रथमच सर्वसामान्य व्यावसायिकाच्या हस्ते श्रीफळ सागराला अर्पण करण्याचा मान पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून देत आहोत, या वर्षी पासून पुढील प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील व्यावसायिक मान्यवराला हा मान मिळणार आहे, सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी बनलेला हा महासंघ प्रत्येक व्यावसायिकाचा, नागरिकाचा स्वतःचा आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने उद्याच्या रॅली मध्ये आपला सहभाग हिरीरीने नोंदवावा , प्रथमच एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनण्याचा योग आपल्या सर्वांसाठी आलेला.आहे,आपल्या पारंपरिक वेशभूषेत आमच्या सोबत चला,भरड दत्तमंदिर येथून अचूक तीन वाजता दि.11/08/22 रोजी,आपल्या संस्कृतीचं, एकतेच प्रतीक संपूर्ण जगाला दाखवूया,सर्वांना आवाहन की प्रथमच मोठ्या संख्येने या रॅली मध्ये संघटित होवूया,न भूतो न भविष्यती अशा रॅलीतून संदेश जगाला पोहोचवूया
तारीख आणि वेळ
11/08/22
दत्तमंदिर भरड नाका,दुपारी 3 वाजता
आपल्या संस्कृतीच रक्षण हे प्रत्येकाचं कर्तव्य,आणि यासाठी येवूया सर्वांनी एकत्र,शेअर करा मेसेज प्रत्येक घराघरात, वाढवूया आपली संस्कृती,जतन करुया आपला वारसा