श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांचा उपक्रम
कुडाळ :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताची ७५ वर्षे पाहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील नामांकित व्यक्तिमत्वांनी स्वतःच्या आवाजात राष्ट्रगीत सादर करून भारतीय स्वातंत्र्याप्रती आपली भावना व्यक्त केली. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ याचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून आजवर या संस्थेचे देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे.
ही मूळ संकल्पना श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुमित पाटील यांची असून हा उपक्रम चलचित्र स्वरूपात आपल्याला पहायला मिळणार आहे. या उपक्रमाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायादिग्दर्शक पराग पाटील यांनी केले असून याचे संकलन अमोघ सागवेकर यांनी केले आहे. मालवण येथील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक शिवहरी रानडे यांनी सांगीतिक साथसंगत केली आहे.
या उपक्रमासाठी बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळच्या पुढील सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. श्री. काशिनाथ आत्माराम सामंत, (८३ वर्ष ) श्री. अरविंद रामचंद्र शिरसाट, (७८ वर्ष) श्री. सुरेश परशुराम ऊर्फ बापु नाईक, (८२ वर्ष) श्री. चंद्रकांत कृष्णाजी ऊर्फ चंदु शिरसाट, (७७ वर्ष) श्री. कमलाकर महादेव इन्सुलकर, (७६ वर्ष ) श्री. शरद वासुदेव ओटवणेकर, (८१ वर्ष) श्रीमती सुधा सुरेश सामंत, (७९ वर्ष) श्रीमती सरोजिनी नारायण कुंटे, (८२ वर्ष) सौ. प्रमिला सुरेश नाईक, (७७ वर्ष ) श्रीमती अपर्णा अशोक जोशी, (७९ वर्ष) या संपूर्ण उपक्रमासाठी प्रवीण बर्वेकर, शनी सोनावणे, सुवर्णा वायंगणकर, प्रणव प्रभू, आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.