You are currently viewing श्री जगन्नाथ संगीत विद्यालय,पखवाज अलंकार श्री महेश सावंत आणि विद्यार्थीवर्ग आयोजित संगीत समारोह आणि भजनी कार्यशाळा संगीत कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय,पखवाज अलंकार श्री महेश सावंत आणि विद्यार्थीवर्ग आयोजित संगीत समारोह आणि भजनी कार्यशाळा संगीत कार्यक्रम उत्साहात संपन्न

कुडाळ

शनिवार दि. ६  आणि रविवार दि. ७ ऑगस्ट २०२२ रोजी आंदुर्ले येथे पखवाज अलंकार श्री महेश विट्ठल सावंत यांच्या निवासस्थानी संगीत महोत्सव साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक ६ ऑगस्ट कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन सामजिक कार्यकर्ते मा.श्री अतुल बंगे, कुडाळ माजी सभापती श्री संजयजी वेंगुर्लेकर, पाट गावच्या माजी सरपंच सौ.कीर्ती ठाकूर मैडम,पाट येथील उद्योजक श्री मंदार प्रभू,चीपी सरपंच श्री गणेश तारी,कुडाळ तहसिलदार पुरवठा शाखेचे श्री प्रवीण मोंड़े,आंदुर्ले गावचे जेष्ठ तबला/पखवाज वादक श्री श्यामसुंदर मांजरेकर,केळुस गावचे तबला विशारद प्रशिक्षक श्री अरुण केळुसकर, कलाकारांसाठी नेहमी प्रोत्साहन देणारे श्री देव सिद्धेश्वर कला क्रिडा मंडळाचे श्री चन्द्र्किसन मोर्ये आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

यानंतर भजनी बुवा श्री दिपक सावंत, श्री घाटकर तसेच श्री दत्तप्रसाद खडपकर आणि श्री सचिन कातवणकर यांच्या अभंग गायनाचा भजनी मेळा रंगला.  तसेच् पखवाज अलंकार श्री महेश सावंत, दत्तप्रसाद खडपकर आणि सचिन कातवणकर यानी उपस्थीत विद्यार्थ्याना भजनी ताल व ठेके यांचे प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दाजी जुवाटकर यानी केले.

दुसर्या सत्रात भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर आणि संगीत अलंकार श्री अजित गोसावी बुवा यानी कोकण पारंपारीक भजन सादरीकरण आणि प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन व साथ संगतीतील अनेक पैलूचे बहुमोल असे मार्गदर्शन उपस्थीत सर्व विद्यार्थ्याना केले व दोन्ही बुवानी भजन गायन करुन उपस्थीत श्रोत्याना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध समालोचक श्री राजा सामंत यानी केले या दिवशी प्रा.श्री वैभव खानोलकर सर, दशावतार झांज मास्टर श्री विनायक सावंत, म्हापण माजी सरपंच आणि सामजिक कार्यकर्ते श्री नाथाभाई मड़वळ,सिंधुदुर्ग पोलिस दलाचे श्री महेश पांगे सर,भजनी बुवा गायक श्री अमित उमळकर तसेच कै.बुवा श्री भुषण देसाई यांचे बंधू श्री आपा देसाई आदि मान्यवरानी उपस्थिती दर्शविली.

दुस-या दिवशीचा दिनांक ७ ऑगस्ट रोजीचा उद्घाटन सोहळा प.पू.श्री नामदेव महाराज मठाचे श्री ला गोसावी,शिक्षक सौ.व श्री पाटील(पाट),शिक्षक श्री विजय गावडे,श्री नितीन सावंत,भजनी बुवा श्री दत्ता पाटील,निवती पोलिस कर्मचारी श्री खोबरेकर,उद्योजक श्री विजु मांजरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.  सुरुवातीला बुवा श्री दत्ता पाटील यानी सुस्वर अभंग गायन करुन श्रोत्याना मंत्रमुग्ध केले.

यानंतर जगन्नाथ संगीत विद्यालयातील विद्यार्थी वर्गाचे पखवाज, ढोलकी सोलोवादन रंगले, भजनी बुवा श्री अमित उमळकर यानीही अभंग गायन करुन रसिकांची दाद मिळवली. यानंतर तबला विशारद श्री धनंजय सावंत आणि श्री अतुल उमळकर यानी सयुंक्त पणे शास्त्रीय तबला वादन करुन अनेक शास्त्रीय बंदिशीं सादर केल्या व रसिक श्रोत्याना मोहुन टाकले. दुपारच्या सत्रात गुरुवर्य डॉ.श्री दादा परब,भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर,गुरुवर्य ॲड.श्री दिलीप ठाकूर आणि श्री महेश सावंत आणि सावंत यानी आपल्या आई व काकाश्री यांचे गुरुपुजन केले. तसेच् सर्वांचे गुरुपुजन श्री जगन्नाथ संगीत विद्यालातील शिष्य वर्गाच्यावतीने करण्यात आले. यानंतर कोल्हापुर येथील सुप्रसिद्ध टिव्ही स्टार ढोलकी वादक श्री भार्गव कांबळे यांचे नजाकतदार आणि बहारदार ढोलकी वादनाने रसिक श्रोत्याना अत्यंत सुखद नजराणा मिळाला.

या कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध गायक एड.श्री दिलीप ठाकूर यांच्या बहारदार संगीत मैफलीने झाली याना हर्मोनियम साथ श्री सतिश शेजवलकर,तबला गुरुवर्य डॉ.श्री दादा परब,पखवाज श्री दत्तप्रसाद खडपकर आणि टाळ श्री सचिन कातवणकर यानी अत्यंत कर्णमधुर केली व गायनाने रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमात मंगलमुर्ती कंट्रक्शन चे आदरणीय श्री नागेंद्र परब साहेब साहेब,वाडी हुमरमळा चे पोलिस पाटील श्री उत्तम पालव साहेब, सिंधुदुर्ग पोलिस कर्मचारी श्री संजय मांजरेकर श्री विनोद पाड़ळकर,श्री महेश पांगे,कुडाळ पुरवठा शाखेचे श्री प्रवीण मोंड़े,आंदुर्ले गावचे जेष्ठ भजनी बुवा श्री पाटकर,श्री दशरथ राऊळ,गावचे जेष्ठ सामजिक कार्यकर्ते श्री वसंत कोनकर,आंदुर्ले सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि युवा भजनी बुवा श्री दिगंबर मयेकर,श्री संतोषजी माधव,श्री नाथाभाई मड़वळ,श्री आनंद म्हापणकर,कुडाळ येथील तबला वादक श्री सिद्धेश नाईक श्री शुभम सुतार,संगीत अलंकार श्री प्रफुल्ल रेवंडकर,सिंधुदुर्ग बैंक निवृत्त कर्मचारी श्री सुहास गावडे,गणेश मुर्तिकार श्री सदानंद मार्गी,भजनी बुवा श्री दिपक खरुडे,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ च्या सौ.दिव्या खरुडे ग्रामस्थ श्री बबन मोर्ये आदी मान्यवर आणि सर्व संगीत श्रोते व पालक आणि सर्व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

या संपुर्णं दिवसाचे सुत्रसंचालन श्री राजा सामंत आणि श्री दाजी जुवाटकर यानी केले पौरोहित्य श्री संदेश करंबळेकर तर ध्वनी व्यवस्था श्री ओमकार वेंगुर्लेकर आणि श्री राजा पिंगुळकर आणि सजावट कु.विनायक खडपकर यानी पार पाडली कार्यक्रम यशस्विततेसाठी पखवाज अलंकार श्री महेश सावंत आणि प्रशिक्षक श्री दत्तप्रसाद खडपकर,सचिन कातवणकर तसेच सर्व विद्यार्थी परिवार वर्गाने यशस्वी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा