मुंबई
काही राजकीय पक्षांचे नेते धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या मुद्द्याच्या आडून आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करण्याआधी भाजपा शासित राज्यांमध्ये बंद असलेली धार्मिक स्थळं सरु करण्यासाठी तेथील मुख्यमंत्र्यांवर दबाव आणावा. महाराष्ट्रात रेल्वे सेवा, बस सेवा, माॅल्स, औषधांची दुकानं, उपहारगृहं व अन्य सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. पण त्यामागचा उद्देश लोकांचा रोजगार जाऊ नये व राज्याची अर्थव्यवस्था सुधारणे हा आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. अभ्यासाअंती याबाबतची नियमावली ठरवली जाईल. यामध्ये कोणीही राजकारण करु नये, असे ना. अस्लम शेख (वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री मुंबई शहर) यांनी म्हटले आहे.