जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रकाश क्षीरसागर लिखित अप्रतिम गझल रचना
जो तो असे निराळा सारे समान कोठे
नसतो जरठ तरीही असतो जवान कोठे
झाला विकास म्हणे पण गल्ल्या जुन्यापुराण्या
आश्वासने फुकाची नेता महान कोठे?
तोऱ्यात वागते तू सोडून लाजलज्जा
अब्रू लुटून जाता उरणार शान कोठे
कोणी इथे उपाशी अन्नान्न का फिरावे
श्रीमंत माणसाचे दिसते न दान कोठे
फुलता कळी जराशी दिसते कितीक मोहक
पडते नजर विखारी भुंग्यास भान कोठे
#. सागर प्रकाश
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
९०११०८२२९९